धारूरची महिला ग्रामसेविका आठ हजराची लाच घेताना उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभाच्या जाळ्यात

0

धारूरची महिला ग्रामसेविका आठ हजराची लाच घेताना उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभाच्या जाळ्यात 

उस्मानाबाद :-  लोकसेवक , सौ.अमरजा मुकुंद शेखदार,वय 42 वर्षे,ग्रामसेवक - ग्रा.पं.धारुर ता.जि.उस्मानाबाद  ( रा.78/1,विद्यानगर,शेळगी, सोलापुर शहर,ता.उत्तर सोलापूर जि.सोलापूर )  यांनी शासकीय अनुदानातील पैसे मिळुन देण्यासाठी  11 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 10,000/- रुपयांची मागणी करुन 8,000/- रुपये स्वीकारण्याची संमती दर्शवली. व लाच स्वीकारली: -- 8000/- रुपये  रक्कम स्विकारता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
                                 
कारण  : -  यातील आलोसे  यांनी तक्रारदार यांचे वडिलांचे नावावर  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेमधील मंजूर असलेल्या व  काम पूर्ण केलेल्या सिंचन विहिरीचा कुशल कामाचा 26,667/- रुपयांचा चेक देण्यासाठी व पहिल्या निघालेल्या बिलाची राहिलेली बाकी अशी एकुण 11,000/ - रुपये लाचेची मागणी  केली.तडजोडी अंती आलोसे यानी तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष 10,000/- रुपयांची लाच मागणी करुण 8000/- रुपये लाच स्वीकारण्याची संमती दर्शऊन 8000/- रुपये लाचरक्कम आज दि.1/6/2021रोजी 14:55 वाजता पंचायत समिती,उस्मानाबाद कार्यालयात पंचांसमक्ष  स्वीकारली.
या वेळी हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.

 हि सापळा कारवाई  प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक , ला प्र वि उस्मानाबाद यांनी मा. डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद , मा.मारुती पंडित, अपर पोलीस अधीक्षक  ला.प्र.वि.औरंगाबाद यांच्या मार्गदर्शन खाली  पोहेकॉ दिनकर उगलमुगले, पांडूरंग डंबरे,पो ना अर्जुन मारकड,मधुकर जाधव, पो का.विष्णू बेळे 
चालक पो.ना. करडे या सापळा पथकाच्या साह्याने सापळख पुर्ण केला आहे.

कोणत्याही शासकीय कामासाठी एखाद्या लोक सेवकाने अथवा लोकप्रतिनिधींनी  तसेच एकादे शासकीय काम केल्याबद्दल बक्षिसी म्हणून काही रकमेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन संपते यांनी केले आहे.  मो . 9527 943 100

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top