स्वयंम शिक्षण प्रयोग कडून गरजू लोकांना अन्न धान्य किट वाटप

0

लोहारा / प्रतिनिधी


स्वयंम शिक्षण प्रयोग संस्था ,उस्मानाबाद ,कौशल्या फाऊंडेशन आणि स्माईल फॉर ऑल यांच्या संयुक्त विद्यमाने लोहारा तालुक्यातील तोरंबा या  गावातील 15 गरीब,गरजू,विधवा ,परितक्ता कुटुंबाना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले,कोविड -19 मुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत,गावातील अपंग ,निराधार लोकांना फुल ना फुलांची पाकळी मिळावी यासाठी स्वयंम शिक्षण प्रयोगचे तालुका व्यवस्थापक शीेतल रणखांब,शिल्पा वेलदोडे,लिडर  बबिता रणखांब यांनी पुढाकार घेऊन मदत स्वरूपात किराणा किटचे वाटप करण्यात करण्याचे ठरवले ,तसेचकृषी सहाय्यक किशोर गायकवाड, ग्रामसेवक एस एस भिसे सर ,सरपंच  वर्षाताई चव्हाण ,उपसरपंच सप्नील चव्हाण यांच्या हस्ते हे किट वाटप करण्यात आले,कोरोना बंदीच्या काळात ही मदत मिळाल्यामुळे या महिलांनी स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या संचालक प्रेमा गोपालम,प्रोजेक्ट डायरेक्टर उपमन्यू पाटील,प्रोजेक्ट मॅनेजर तबसुम मोमीन यांचे आभार मानले ,यावेळी स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या लिडर  बबिता रनखांब  ,अंगणवाडी कार्यकर्त्या  उपस्थित होत्या,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top