उस्मानाबाद : आठ हजार रुपये लाच रक्कम स्विकारल्याने दुय्यम निरीक्षकासह जवाणाला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद यांनी घेतले ताब्यात

0
 

उस्मानाबाद :- 8000/- रुपयांची लाच रकमेची मागणी 8000/- रुपये  लाच रक्कम स्विकारल्याने दुय्यम निरीक्षकासह जवाणाला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद यांनी घेतले ताब्यात

तक्रारदार  यांची बियर शॉपी असून त्यांनी बियर शॉपीच्या परवण्याचे नूतनीकरण करण्यासाठी शासकीय चलन भरून  परवाना नूतनीकरणासाठी आरोपी  लोकसेवक :- 1) सुमित सुधाकर  फावडे, वय 31 वर्ष, पद दुय्यम निरीक्षक वर्ग 3, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय उमरगा, दुय्यम निरीक्षक  राज्य उत्पादन शुल्क, उमरगा ( वर्ग 3) 2) श्‍याम किशोर राऊत, वय 33 वर्ष, पद जवान, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय उमरगा ( वर्ग 3) यांच्याकडे दिलेला होता.. सदर परवाना तक्रारदार यांना देण्यासाठी आलोसे क्रमांक 1 व 2 यांनी 8000 /- रुपये लाचेची मागणी करून आलोसे क्र. 2 यांनी पंचांसमक्ष स्वीकारली  याबाबत  पो स्टे उमरगा, ज़िल्हा उस्मानाबाद येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया चालू आहे.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री.राहुल खाडे ,  प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वी उस्मानाबाद यांचे  मार्गदर्शनाखाली

 गौरीशंकर पाबळे  , पोलीस निरीक्षक,  ला. प्र. वी.उस्मानाबाद यांनी केली. याकामी त्यांना पोलीस अंमलदार, शिवाजी सर्जे, मधुकर जाधव, विष्णू बेळे, विशाल डोके, चालक दत्तात्रय करडे यांनी मदत केली.
कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे सम्पर्क करण्याबाबतचे आवाहन प्रशांत संपते, पो.उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद ( मो.नं.९५२७९४३१००) गौरीशंकर पाबळे, पोलीस निरीक्षक, ला. प्रा. वी. उस्मानाबाद ( मो. क्र. 8888813720) अशोक हुलगे, पोलीस निरीक्षक, ला. प्रा. वी. उस्मानाबाद (मो. क्र.8652433397) यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top