आपसिंगा येथील गरीब कुटुंबाला ‘मन्नत’ची मदत
जून ०८, २०२१
0
उस्मानाबाद, दि. ८ - कोरोनामुळे घरातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबाच्या मदतीसाठी मन्नत फाउंडेशन धावले आहे. त्यामुळे मयत रूग्णाच्या कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.
तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा येथील अत्यंत गरीब कुटुंबातील चंद्रकांत सुभाष गोरे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. त्यांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. घरातील कर्ता व्यक्तीच गेल्याने गोरे कुटुंबीय आर्थिक अडचणीत होते. घरात चंद्रकांत गोरे यांचे वृध्द आई-वडिल, पत्नी व मुलांवर उपासमारीची वेळ येत असल्याची माहिती कामठा येथील मन्नत फाउंडेशनपर्यंत पोहोचल्यानंतर फाउंडेशनचे पदाधिकारी, सदस्य मदतीला धावले आणि तत्काळ पाच हजार रूपयांचे आर्थिक सहाय्य केले. यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शरीफ ईलाही शेख, सदस्य शायद शेख वाघोलीकर, दत्ता महादेव देशमुख, श्रीराम कुंभार, अपसिंगा गावातील वकील दिगंबर भाकरे, धीरज क्षीरसागर हे उपस्थित होते.
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा