तुळजापूर येथे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ सपकाळ व प्रा.घाडगे यांचा सत्कार

0
  तुळजापूर,दि.3, येथील तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथील वाणिज्य विभागातील प्रा.डॉ.हनमंत सपकाळ तसेच ज्युनिअर विभागातील प्रा.राजेंद्रकुमार घाडगे हे आपल्या प्रदिर्घ सेवे नंतर वयपरत्वे सेवानिवृत्त झाले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.डॉ.सपकाळ यांची श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था अंतर्गत 33 वर्ष 11 महिने 18 दिवस यशस्वीरित्या सेवानिवृत्ती झाली तसेच प्रा.घाडगे हे ही 33 वर्ष इतक्या प्रदिर्घ सेवेनंतर  नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांनी त्यांना पुढील भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी महाविद्यालयातील प्रा.आशपाक आतार,प्रा.धनंजय लोंढे, कार्यालयीन कर्मचारी सुमेर कांबळे , गोवर्धन भोंडे  तुकाराम शिंदे यांची उपस्थिती होती.

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top