बस स्थानकात आढळलेल्या दोन्ही बेवारस बहिनी आईच्या ताब्यात.

0


उमरगा पोलीस ठाणे : उमरगा म.रा.मा.प.म.बस स्थानकातील लातुर बसच्या फलाटावर अनुक्रमे 2 महिने व 3 वर्षे वयाच्या दोन मुली दि. 24 जुलै रोजी 17.00 वा. बस स्थानक प्रशासनास आढळल्या होत्या. त्या मुलींच्या पालकां विषयी काही माहिती न मिळाल्याने दोन्ही मुलींना उमरगा पो.ठा. येथे आनुन महिला पोलीस अंमलदारांच्या देखरेखीत ठेवण्यात आले होते. 


तसेच त्या दोघींना बेवारस सोडणाऱ्या अज्ञात पालकांवर भा.दं.सं. कलम- 317 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. तपासादरम्यान उमरगा पोलीसांनी बस स्थानकातील व परिसरातील  सीसीटीव्ही चित्रण पाहुन त्या मुली कोणासोबत बस स्थानकात आल्या आहेत ? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तसेच त्या दोन्ही मुलींची छायाचित्रे सपोनि- श्री सिध्देश्वर गोरे, पोलीस अंमलदार- सुनिता राठोड, आम्रपाली पाटील, बबीता शिंदे यांनी स्थानिक व्हाट्सअप गटांत प्रसारीत केली. मोठ्या मुलीची भाषा बंजारा असल्याचा अंदाज आल्याने बंजारा भाषीक प्रकाश चव्हाण या तरुणाच्या मार्फत तीची विचारपुस करण्यात आली. 

पोलीसांच्या या प्रयत्नांना अखेर यश येउन त्या मुली मुरुम येथील पाटील तांड्यावरील असल्याचे अवघ्या 4तासांत समजले. यावर त्या मुलींची आई- सुनिता व इतर नातलग यांना पोलीस ठाण्यात बोलावून खात्री करुन दोन्ही मुलींना आई- सुनिता हिच्या ताब्यात देण्यात आले. तसेच दोन्ही मुलींना आई- सुनिता हिने बस स्थानकात बेवारस सोडण्याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top