रोडवर सायंकाळी फिरायला गेलेल्या दोघांना क्रुजरने उडवले; एक ठार, एक जखमी

0

 रोडवर सायंकाळी फिरायला गेलेल्या दोघांना क्रुजरने उडवले; एक ठार, एक जखमी


कळंब : शहरात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सायंकाळी कळंबकडून डिकसळच्या दिशेने फिरायला निघालेल्या दोघांना भरवेगाने आलेल्या क्रुजर गाडीने पाठीमागून धडक देऊन पलायन केले. ज्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या व्यक्तीला किरकोळ जखम झाली आहे.

त्यामुळे एकच खळबळ उडाली. मूळ पाथर्डी येथील रहिवासी असलेले व सध्या डिसकळ भागातील संभाजी नगर येथे राहणारे अण्णासाहेब बाबासाहेब पिंगळे वय अंदाजे 47 हे दररोज सायंकाळच्या वेळेस डिकसळ रोडने फिरायला जात होते.

आज देखील ते आपल्या मित्रासोबत फिरायला निघाले होते. मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातला. सायंकाळी 6.30 वाजताच्या दरम्यान राजधानी हॉटेलच्या समोर अज्ञात क्रुजर गाडीने त्यांना धडक दिली.

या धडकेत पिंगळे 100 फूट लांब जाऊन पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागले. तर त्यांच्यासोबत असलेल्या एकाला किरकोळ दुखापत झाली.

पिंगळे यांना तात्काळ रुग्णवाहिका बोलवून कळंब उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर धडक देणारी क्रुजर गाडी घटनास्थळावरून फरार झाली. थोड्यावेळाने पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र अद्यापपर्यंत क्रुजर गाडीचा पत्ता लागला नाही. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top