पारा येथे पाहुण्याच्या हस्ते गुणवंताचा सत्कार कार्यक्रम संपन्न

0

पारा येथे पाहुण्याच्या हस्ते गुणवंताचा  सत्कार कार्यक्रम संपन्न 


पारा - वाशी तालुक्यातील ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा  संचालित , पारा येथील जय भवानी विद्यालयात आज दि 26 , सोमवार रोजी गुणवंताचा सत्कार कार्यक्रम पार पडला . या वेळी इयत्ता दहावी मार्च 2021  परीक्षेत  गुणवंत झालेले विद्यार्थ्यांना  पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला.यामध्ये प्रथम क्रमांक अंजली काशीनाथ भोसले, द्वितीय हर्षदा अशोक डोईफोडे , तृतीय अंजली धर्मराज थोरबोले आणि सण 2020 मधील गुणवंत नेहा सुभाष कुरुंद, प्रतीक्षा कुरुंद, सानिया महेबूब पठाण  यांना  रोख रकमे सह पारितोषिक विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे संजय माकृवार सर ( प्राध्यापक ) , रघुनाथ भराटे , उद्धव शिंदे , मु अ मोरे सर , शालेय समिती अध्यक्ष  शंकर शेळके यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले . प्रत्येक वर्षी प्रशालेचे माजी विद्यार्थी आणि प्राध्यापक असलेले . संजय माकृवार सर यांच्या कडून दहावी परीक्षेत प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि शाळेचे काही देने लागते म्हणून दरवर्षी  पारितोषिक दिले जाते . शाळेत राबवले जाणारे सर्व उपक्रम ,उपाययोजना विविध शैक्षणिक उपक्रम यांची माहिती मुख्याध्यापक मोरे सर यांनी माहिती सांगितली या कार्यक्रमासाठी पत्रकार बंधू दत्तात्रय भराटे,  विकास भराटे, रोहित शेळके तसेच सूर्यकांत पांचाळ, रविंद्र कुरुंद, अशोक डोईफोडे, मोहन चौधरी, रामभाऊ विधाते, पालक , प्रशाळेतील सर्व कर्मचारी ,  विद्यार्थी कोरोनाचे नियम पालन करत  उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top