उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वरोग निदान शिबीर, वृक्षारोपण

0

उमरगा प्रतिनिधी (महादेव पाटील)

 महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त येळी येथे दि .२२ रोजी सर्वरोग निदान शिबिर व वृक्षारोपणाचा उपक्रम घेण्यात आला .
               महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त  राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर, प्राथमिक आरोग्य केंद्र येणेगुर यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील जेष्ठ नागरिक बाबूसाबब आवटे होते तर प्रमुख पाहुणे म्हणूण कृषीभुषण गोवींदराव पवार, प्रदेश सदस्य प्रा.दत्ता इंगळे ,युवक तालुका अध्यक्ष शमशोद्दिन जमादार, युवक जिल्हा उपाध्यक्ष मोहन जाधव , ग्रंथालय विभागचे जगदीश सुरवसे आदींची प्रमुख उपस्थीती होती .
तर स्पर्श रूग्णालयाचे डॉ . सुरज सावळकर, आरोग्य सेविका पूजा भोसले , आदिनाथ डीग्गे , कृष्णा यादव ,येणेगुर प्रा .आ .केंद्राचे डॉ .मजावर , आरोग्य सेवीका सौ .घोंगडे , श्री . जाधव यांनी सर्वरोग निदान शिबिर यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी प्रयत्न केले . ग्रामस्थांची तपासणी करून आवश्यकतेप्रमाणे विविध चाचण्या व औषधोपचार देण्यात आले. गावातील वृद्ध वयस्कर नागरिकांची आरोग्य तपासणीची सोय झाल्याने  आनंद व्यक्त केला . गावातील २१६ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली .
            येळी ग्रामपंचायत परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले . सर्व उपस्थितांचे व ग्रामस्थांचे युवक राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष बाबा पवार यांनी आभार मानले . यावेळी  माजी उपसरपंच व्यंकटराव मोरे ,माजी सरपंच शिवलिंग आप्पा माळी, रामलिंग बिराजदार, हरकिशन पवार अतुल हिंगमिरे, वाघंबर सरवदे , सागर बिराजदार, भैय्या मुजावर , बाळासाहेब मोरे ,मंगेश पवार, नंदू भोसले, ओमकार फुकटे ,जीवन अंगबरे ,रजनीकांत स्वामी, महेश भोसले, राहुल पाटील ,विकी मुळे , लक्ष्‍मण कोळी, वेंकट रेड्डी, अमोल सांगूळगे, महेश सजगुरे ,ओमकार चव्हाण, सुरज रेड्डी, यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top