स्पर्श' चे प्रकल्प अधिकारी डॉ. रमाकांत जोशी यांचा सत्कार

0
'स्पर्श' चे प्रकल्प अधिकारी डॉ. रमाकांत जोशी यांचा सत्कार 

लोहारा ( इकबाल मुल्ला ) 
ग्रामीण तसेच दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहचविण्यासाठी लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील प्राईड इंडिया 'स्पर्श'मार्फत उस्मानाबाद जिल्ह्यात चार फिरत्या मोबाईल मेडिकल युनिट मार्फत 136 गावात आरोग्य सेवा दिली जात आहे. सेवाभावी वृत्तीतून केले जाणारे हे महत्वपूर्ण कार्य प्रकल्प अधिकारी डॉ.रमाकांत जोशी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली होत असल्यामुळे त्यांचा जवळगा बेट च्या वतीने सोमवार दि.26 जुलै 2021 रोजी प्रा.डॉ.श्रीकांत गायकवाड, माजी सरपंच राम मुकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला. फिरत्या मोबाईल मेडिकल युनिटद्वारे आरोग्य तपासणी, औषधोपचार, लसीकरण, गरोदर माता प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्यात सेवा,ज्येष्ठ नागरिक  तपासणी व उपचार,रक्त, लघवी तपासणी, इ.सी.जी या सर्व सेवा सुविधा दिल्या जात आहेत. त्यामुळेच आरोग्य सेवेचा हा सास्तूर पटर्न' कौतुकस्पद ठरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top