उस्मानाबाद दि.२४ (प्रतिनिधी) - तालुक्यातील वाघोली येथे नायब तहसिलदार तथा उस्मानाबाद तालुका पुरवठा अधिकारी राजाराम केलूरकर यांनी दि.२४ जुलै रोजी येथील स्वस्त धान्य दुकानात भेट देऊन या दुकाना मार्फत वितरित होत असलेल्या धान्याची तपासणी केली.
यावेळी रेशन कार्ड वाटप करण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. वाघोली येथील ज्या नागरिकांना रेशन कार्ड नाही. त्यांना लवकरात लवकर रेशन कार्ड वाटप करण्याच्या सूचना केलूरकर यांनी स्वस्त धान्य दुकानदार आप्पा शिंदे यांना दिल्या. यावेळी शिवसेना कक्ष उपजिल्हाप्रमुख तथा सरपंच संजय खडके, उपसरपंच नितीन चव्हाण, मुकुंद पाटील, राजभाऊ मोरे, राहुल सुलाखे, सुनील मगर, उमेश उंबरे, आप्पा साखरे, सुनील सुतार, रेशन दुकानदार आप्पा शिंदे, बबलू रोहिदास, गुणवंत धनके, जाकीर शेख, राजाराम मगर आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.