उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार विरोधी कारवाई ,16 छापे

0


उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार विरोधी कारवाई ,16 छापे 

उस्मानाबाद जिल्हा : जुगारा विरोधात उस्मानाबाद पोलीस दलाने दिनांक 10 ऑगस्ट रोजी 16 छापे टाकुन  गुन्हे नोंदविले आहेत.यात पळसगाव तांडा येथील  संजय जाधव व अमिन पटेल हे दोघे  उमरगा शहरातील प्रभात हॉटेल मागे मटका जुगार चालवण्याच्या उददेशाने साहित्य व 1180 रुपये बाळगलेले तर कुन्हाळी गावात सुरेश वाघमोडे हे मटका जुगार चालवण्याच्या उददेशाने साहित्य व 480 रुपये बाळगलेले असताना उमरगा पोठाच्या पथकास आढळले.



            कळंब येथील मदीना चौकात सरफराज सययद तर बाजार मैदानात जुनैद बेग हे अनुक्रमे 1250 व 1150 रुपयासह मटका जुगार चालवण्याच्या उददेशाने साहित्य बाळगलेले असताना कळंब पोठाच्या पथकास आढळले.



            साठे चौक तुळजापूर येथे प्रविण गुंड हे मटका जुगार चालवण्याच्या उददेशाने साहित्य व 1120 रुपये बाळगलेले असताना तुळजापूर  पोठाच्या पथकास आढळले.



            भुम येथील पाथ्रुड रस्त्यालगत रज्जाक फकीर हे मटका जुगार चालवण्याच्या उददेशाने साहित्य व 550 रुपये बाळगलेले असताना भुम  पोठाच्या पथकास आढळले.



            कनगरा गावात अमोल शिंदे हे मटका जुगार चालवण्याच्या उददेशाने साहित्य व 500 रुपये बाळगलेले असताना बेंबळी  पोठाच्या पथकास आढळले.



            शिवाजी माने हे काळेगावात  1050 रुपये, किरण माळवदकर हे लोहारा येथे 1030 रुपये ईरशाद सवार हे सास्तुर येथे 620 रुपये व मटका जुगार चालवण्याच्या उददेशाने साहित्य बाळगलेले असताना लोहारा  पोठाच्या पथकास आढळले.



            सोनेगाव येथे दत्तात्रय मोरे हे मटका जुगार चालवण्याच्या उददेशाने साहित्य व 1430 रुपये बाळगलेले असताना उस्मानाबाद ग्रामीण पोठाच्या पथकास आढळले.



            तांबेवाडी येथे शशीकांत मोराळे हे मटका जुगार चालवण्याच्या उददेशाने साहित्य व 360 रुपये बाळगलेले असताना परांडा पोठाच्या पथकास आढळले.



            आंबी येथे नान्नज -जवळा रस्त्यालगत विलास खाडे, गणेश खाडे, संतोष खाडे, सोमनाथ दैन हे तिरट जुगार खेळताना जुगार साहित्य व 1240 रुपये रकमेसह आंबी पोठाच्या पथकास आढळले.



            ढोकी येथील पेट्रोल पम्प चौकात खयुम सययद हे मटका जुगार चालवण्याच्या उददेशाने साहित्य व 350 रुपये बाळगलेले असताना ढोकी पोठाच्या पथकास आढळले.



            शिराढोण येथे मैनुददीन शेख हे मारुती मंदीर परिसरात तर उमेश सहाने होळकर चौकात मटका जुगार चालवण्याच्या उददेशाने साहित्य व अनुक्रमे 695 व 2515 रुपये बाळगलेले असताना शिराढोण पोठाच्या पथकास आढळले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top