मुरूम पोलिस ठाणे हद्दीत खून!
उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरुम पोलीस ठाणे हद्दीतील कलदेव निंबाळा येथील 50 वर्षीय निळकंठ विठोबा कांबळे यांचा खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती य ठिकाणी पोलिसांनी जाऊन पाहणी केली व याबाबत अधिक माहिती अशी की कलदेव निंबाळा येथील ग्रामस्थ निळकंठ विठोबा कांबळे वय 50 वर्षे हे दिनांक 09 ऑगस्ट रोजी 21.30 वा नित्या प्रमाणे शेतात झोपण्यास गेले होते.
दुस-या दिवशी सकाळी त्यांचा मृतदेह शेतात आढळला असता दोन्ही कानातुन रक्तस्त्राव झाल्याचे व उजव्या कानावर जखम असल्याचे दिसुन आले. यावरुन त्यांचा खून झाला असु शकतो .अशा मजकुराच्या मुलगा –साईनाथ यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302 अंतर्गत मुरूम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला आहे.