google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 75 व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून लिंगाणा सुळक्यावर फडकवला 75 फुट भारतीय तिरंगा ध्वज : 75 Indian Independence Day

75 व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून लिंगाणा सुळक्यावर फडकवला 75 फुट भारतीय तिरंगा ध्वज : 75 Indian Independence Day

0

75 व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून लिंगाणा सुळक्यावर फडकवला 75 फुट भारतीय तिरंगा ध्वज : 75 Indian Independence Day

- शिलेदार संस्थेच्या गिर्यारोहकाचें यश  

   जाग्यावरच तीव्र उंच असलेला सुळका, त्यात खडकाळ भुभागावरील निसरडी वाट असलेल्या दुर्गम अशा लिंगाण्याच्या 'वाटेला' किमान पावसाळ्यात तर कोण जात नाही. मात्र दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रखर देशभक्ती असलेल्या 'शिलेदार संस्थेच्या' नऊ गिर्यारोहकांनी हा गिरीदुर्ग तर सर करत देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी लिंगाण्यावर ७५ फुट भारतीय तिरंगा ध्वज फडकावला आहे.




सह्याद्रीच्या उंचच उंच अशा पर्वतराजीत स्वराज्याची राजधानी रायगड दिमाखात उभा असताना काही अंतरावर लिंगाणा यासह अन्य पाच किल्ले सातत्याने जागता पहारा देत असत. एकूणच रायगडचा उपदुर्ग असलेला लिंगाणा हा अतिशय दुर्गम व तीन हजार फुटांपेक्षा अधीक उंचीचा हा सुळका कठीण आहे.  

रायगड जिल्ह्यातील महाडपासून काही अंतरावर असलेल्या अरुदं वाटाच्या व विविध घाटांच्या या दुर्गम भागातील लिंगाणा हा दुर्ग पावसात सर करणे कठिण असते. 







अशा या खडतर मोहिमेची आखणी शिलेदार गिर्यारोहण संस्थेने केली. स्वातंत्र्यदिनी लिंगाणा सर करायचा व तेथे तिरंगा फडकावयचा असा दृढनिश्चय केला. शिलेदार संस्थेचे गिर्यारोहक अनिकेत जाधव, सागर मोहिते, शैलैश जाधव, मोनिष येनपुरे, कविता बोटले, शीतल जाधव, अमिता सालीयन, विनायक पुरी, प्रशांत सुर्यवंशी, शुभम राखुंडे, प्रितेश गुडेकर, रजनीकांत जाधव या धाडशी मोहिमेत सहभागी झाले होते. 

संस्थेचे अनुभवी गिर्यारोहक प्रविण परब व सागर नलवडे यांच्या नेतृत्वाखाली टिमने दिनांक १४ ऑगस्ट रोजी लिंगाण्या जवळच्या मोहरी गावात मुक्काम करून दुसर-या दिवशी सकाळी मोहिमेची सुरवात केली. यासाठी कठीण बोराट्याची नाळ या अरुंद, घसरण असलेल्या घाटातून मार्गस्थ होत, एकमेकांचा आधार बनत लिंगाणा बेसला पोहचले व लिंगाणा सर करत त्याठिकाणी ७५ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत ७५ फुट तिरंगा दिमाखात फडकवला. 




© मोहिम फत्ते -

उंचच्या उंच सुळका, त्याची खडकाळ व निसरडी वाट, नाळेत खळाळणारे पाणी, जागोजागची घसरण, धुक्याचे सावट तसेच मुसळधार पावसात  लिंगाणा सर करणे कठीणच असते असे शिलेदार संस्थेच्या सदस्यांनी सांगितले. आम्ही सर्वानी एकमेकांना आधार देत, काळजी घेत ही मोहीम पावसाळ्यातच फत्ते केली असे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top