हळदुगे ता.बार्शी.येथील कृषिकन्या करतेय शेतकऱ्यांना मार्गदर्शन.

0

हळदुगे ता.बार्शी.येथील कृषिकन्या करतेय शेतकऱ्यांना मार्गदर्शन.         


   सोलापूर :-    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण कृषी उद्योजकता जागृती विकास योजना आणि कृषी-औद्योगिक जोड कार्यक्रम 2021- 22 कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी सध्या त्यांच्या मूळ गावी असल्याने तेथेच त्यांना प्रात्याशिक करण्याची परवानगी देण्यात आली आहे .


त्या अनुषंगाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत एच. एच .एस .एस.मुरलीधर स्वामिजी कृषी महाविद्यालय मालेगाव कॅम्प जिल्हा नाशिक या महाविद्यालयाची विद्यार्थिनी आसमा राजुद्दीन मुलाणी हिने हळदुगे येथील शेतकऱ्यांना रासायनिक आणि जैविक पद्धतीने बीज प्रक्रिया करून प्रत्याशिक करुन दाखवले. 


बीच प्रक्रिया केल्याने पिकाची उगवण क्षमता वाढते. तसेच कोरड्या कचर्‍यावर प्रक्रिया करताना गुळ ,मीठ, युरिया यांचे मिश्रण करून प्रक्रिया केल्यास दूध वाढीस फायदा होते हे शेतकऱ्यांना सांगितले. वृक्ष रोपणासाठी योग्य पद्धतीने खड्डा घेऊन वृक्षारोपण केले. यावेळी गावातील शेतकरी उपस्थित होते.


प्राचार्य पी.ए.तुरबटमठ,उपप्राचार्य डॉ. एस. ए राऊत,डाॅ. पी.के.सूर्यवंशी,प्रा.शैलेश अहिरे ,डॉ जी.एस बनसोडे,प्रा.एस. व्ही बागल, प्रा. एस.के.उदमले.यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी  वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top