स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य ध्वजारोहन कार्यक्रमात कोरोना योध्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

0


स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य ध्वजारोहन कार्यक्रमात कोरोना योध्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

 

    उस्मानाबाद,दि.11(जिमाका):- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनाच्या येथील मुख्य शासकीय कार्यक्रमात जिल्हयातील कोरोना महासाथीच्या काळात उत्कृष्ट सेवा बजावलेल्या अधिकारी,कर्मचारी,डॉक्टर,नर्सेस आणि अत्यंविधीसाठी झटलेल्या संस्थां,व्यक्तिंचा पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.त्यासाठी निश्चित केलेल्या नावांची यादी एक दिवस अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावी,असे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे दिले.





      येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व तयारीची बैठक जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, तेव्हा ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,अपर जिल्हाधिकारी रुपाली अवले,निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,उपजिल्हाधिकारी (रोहयो) महेंद्रकुमार कांबळे,उपजिल्हाधिकारी (सामान्य)सचिन गिरी,उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत वडगावे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डी.के.पाटील,माध्यमिक शिक्षण अधिकारी गजानन सुसर,उपविभागीय अभियंता गपाट,विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील,जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी,तहसीलदार गणेश माळी आदी उपस्थित होते.






     स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोपवलेल्या जबाबदारीतील कामे संबंधित विभागांनी वेळेत पूर्ण करावीत,असे सांगून जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक,निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, उस्मानाबादचे तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, नगर पालिकेचे मुख्याधिकारी, वीज वितरण कंपनीचे,अधीक्षक अभियंता,राज्य उत्पादन शुल्क,जिल्हा शल्य चिकित्सक, शिक्षणाधिकारी आदींच्या कामाचे स्वरुप सांगून त्यांच्या कार्यवाही बाबत आदेश दिले.तसेच सर्व कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या कार्यालयातील रिक्त पदांची माहिती लवकरात लवकर कळवावी,असेही आदेश यावेळी दिले.मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमास येताना शासकीय पोषाखात यावे,असेही सांगितले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा स्वातंत्र्य दिन साजरा करावयाचा असल्याने उपस्थित राहणाऱ्या अधिकारी,कर्मचारी,स्वातंत्र्य सैनिक,लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना कोरोना प्रतिबंधा संबंधितांच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे,असे आवाहनही जिल्हाधिकारी  यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top