महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी कागदपत्र अपलोड करावीत - धीरज कुमार
उस्मानाबाद,दि.11(जिमाका)
महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/हे
महा डीबीटी पोर्टलवर लॉटरी प्रक्रियेतून विविध घटकांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांची निवड झाली आहे.शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून पूर्व संमती पत्र प्राप्त झाल्यावर कागदपत्रे छाननी करण्यासाठी डीबीटी पोर्टलवर अपलोड करावी लागतात.परंतु कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर नजीकच्या सामुहिक सेवा केंद्रे,कृषी कार्यालये ई ठिकाणी जाऊन कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करण्यास गैरसोईचे होत आहे.त्यामुळे पुढील छाननी प्रक्रियेतील विलंबामुळे जलद अनुदान वितरणास मर्यादा येत आहेत.
शेतकऱ्यांची सदरची होणारी गैरसोय टाळण्यासाठी कृषी विभागाने“MahaDBT Farmer”नावाचे मोबाईल अप्लिकेशन तयार केले आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या स्वतःच्या android स्मार्ट मोबाईल वरून गुगल प्ले स्टोअरवर जाऊन”MahaDBT Farmer” हे अप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यावा.या सुविधा वापरकर्ता आयडी आणि आधार क्रमांक आधारित असल्याने एकाच गावातून स्मार्ट मोबाईल असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवर या अप्लिकेशन डाऊनलोड केल्यास अनेक लाभार्थी त्यावरून कागदपत्रे अपलोड करू शकतात.
या कामासाठी आपण आपल्या जवळच्या सामूहिक सेवा केंद्राची मदत घेऊ शकता. तसेच यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या ई-मेल वर किंवा 020-25511479 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.सर्व शेतकरी “MahaDBT Farmer”या मोबाईल अप्लिकेशनचा वापर करून आपली कागदपत्रे लवकरात लवकर अपलोड करावीत, जेणेकरून अनुदान वितरण प्रक्रिया जलद होईल,असे आवाहन कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी केले आहे. ****