तुळजापूर येथील डॉक्टरवर कार्यवाहीसाठी मयत युतीच्या नातेवाईकांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

0

तुळजापूर येथील डॉक्टरवर कार्यवाहीसाठी मयत युतीच्या नातेवाईकांचा  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा  प्रयत्न




उस्मानाबाद :-  तुळजापूर येथील डॉक्टरवर कार्यवाही करण्यासाठी मयत युतीच्या नातेवाईकांनी आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला याबाबत सविस्तर माहिती अशी की  तुळजापूर शहरातील प्रतीक्षा पुणेकर या अठरा वर्षीय युवतीचा शहरातीलच कुतवळ हॉस्पिटल येथील डॉक्टरचे चुकीचे उपचार व हलगर्जी केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप करत आज ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला सांगता होण्याचे दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे.



 याप्रकरणी युवतीच्या कुटुंबातील सर्वांनाच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे युवतीचे वडील प्रकाश पुणेकर व आई संजीवनी पुणेकर यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती वेताळ नगर भागात राहणारे प्रकाश पुणेकर व संजीवनी पुणेकर यांची एकुलती एक मुलगी प्रतीक्षा पुणेकर हिला उलटी होऊन पोटात दुखत असल्याच्या कारणाने शहरातील कुतवळ हॉस्पिटलमध्ये 4 फेब्रुवारी 2020 मध्ये अॅडमिट करण्यात आले होते.



चार दिवस कुतवळ हॉस्पिटलमध्ये मुलीला ठेवण्यात आले व शेवटी 8 फेब्रुवारी 2020 ला पहाटे अचानक मुलीला सोलापूरला नेण्यास डॉक्टरांनी सांगितले. दुर्दैवाने त्याच दिवशी मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या डॉ. दिग्विजय कुतवळ यांच्याविरुद्ध वारंवार तक्रारी देऊनही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई होत नसल्याने मुलीचे नातेवाईकानी आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच मयत युवतीच्या वडिलांनी पत्रकार परिषद घेवून संबधीत डॉक्टरांवर कार्यवाही न झाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशाराही देण्यात आला होता  पोलिसांनी नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top