लोहारा-उमरगा तालुक्यातील विविध विकास कामांचे
पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते भूमिपूजन
उस्मानाबाद,दि.14(जिमाका):- लोहारा आणि उमरगा तालुक्यातील ग्रामीण तसेच उमरगा शहरातील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि उद्घाटन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते आज करण्यात आले.
पालकमंत्री श्री.गडाख यांच्या हस्ते प्रथम लोहारा येथे जिल्हा वार्षिक नियोजन समिती निधीतील दोन कोटी 20 लाख रुपयांच्या शहरात करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. याबाबतच्या कोनशीलेचे अनावरण श्री.गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनतर जेवळी ग्रामपंचायत अंतर्गत 40 लाख रुपयांच्या विविध विकास कामांच भूमिपूजन करण्यात आले.यात सिमेंट रस्ते, विद्युतीकरण आणि शासकीय उर्जा संच बसविण्याच्या कामांचा समावेश आहे. दीड कोटी रूपये खर्चून तयार करण्यात येणाऱ्या जेवळी-येणेगूर रस्त्याच्या कामाचेही यावेळी भूमिपूजन करण्यात आले. हे काम पूरहानी दुरुस्ती योजनेतून करण्यात येणार आहे.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जकेकूर ते राजेभास्कर रस्ता करण्यात येणार आहे. त्यासाठी आठ कोटी 50 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याचेही भूमिपूजन या दौऱ्यात करण्यात आले.
उमरगा शहरातील आठ कोटी 43 लाख रुपयांच्या विविध विकास कामाचे उद्घाटन आणि लोकार्पण पालकमंत्री गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. ही सर्व कामे जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून करण्यात येणार आहेत. उमरगा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील हमाल भवनाचे लोकार्पनही आज पालकमंत्री श्री.गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.
या सर्व विकास कामाच्या भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण संमारंभास लोहारा-उमरगाचे आमदार ज्ञानराज चौगुले, माजी खासदार रविंद्र गायकवाड, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, किरण गायकवाड, बाजार समितीचे सभापती मोहीयोदीन सुलतान, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बसवराज वरनाळे, तालुका प्रमुख मोहन पनुरे, उपसभापती रमेश माने, सचिव सध्दपा घोडके आदी उपस्थित होते.
*****