उस्मानाबाद जिल्ह्यात सहा ठिकाणी चोरी गुन्हा दाखल

0



उस्मानाबाद जिल्ह्यात सहा ठिकाणी चोरी गुन्हा दाखल

उस्मानाबाद जिल्हा : 1) कल्याण मंडगे, रा. प्रकाशनगर, उस्मानाबाद यांची हिरो डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएन 3917 ही दि. 06 ऑगस्ट रोजीच्या रात्री त्यांच्या घरासमोरुन तर 2) संतोष मनाळे, रा. होळी, ता. लोहारा यांची हिरो डिलक्स मो.सा. क्र. एम.एच. 24 एई 2089 ही दि. 29- 30 जून 2021 दरम्यानच्या रात्री त्यांच्या घरासमोरुन तर 3) अब्दुल नदाफ, रा. डिग्गी रोड, उमरगा यांची हिरो होंडा स्प्लेंडर मो.सा. क्र. एम.एच. 25 झेड 5404 ही दि. 06- 07 ऑगस्ट दरम्यानच्या रात्री त्यांच्या घरासमोरुन अज्ञाताने चोरुन नेली. यावरुन वर नमूद तीघांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत आनंदनगर, लोहारा व उमरगा या पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले आहेत.

 




आनंदनगर पोलीस ठाणे : अंगद विलास आगळे, रा. माणिक चौक, उस्मानाबाद यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 01- 07 ऑगस्ट दरम्यान तोडून घरातील 34 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने, चांदीचे दागिने- वस्तू व 60,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या अंगद आगळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 



लोहारा पोलीस ठाणे : प्रमोद बंगले, रा. लोहारा यांच्या शेत विहीरीतील 5 अश्वशक्ती क्षमतेचा पानबुडी विद्युत पंप दि. 06- 07 ऑगस्ट दरम्यानच्या रात्री तर भागवत बनकर, रा. धानुरी यांच्या धानुरी गट क्र. 624 मधील शेत तळ्यातील सीआरआय कंपनीचा विद्युत पंप दि. 05- 06 ऑगस्ट रोजी दरम्यान अज्ञाताने चोरुन नेला. अशा मजकुराच्या प्रमोद बंगले व भागवत बनकर या दोघांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

 




उस्मानाबाद (ग्रा.) पोलीस ठाणे : नाशिक- हैद्राबाद जात असलेल्या मालवाहु मिनीट्रकची गती भुम- येडशी रस्त्यावर दि. 05 ऑगस्ट रोजी रात्री 02.30 ते 04.00 वा. दरम्यान कमी झाली होती. यावेळी अज्ञात चोरट्याने धावत्या ट्रकवर चढून टारपोलीन फाडून रबरी ट्युबचे व्हाल्व असलेली ॲक्युरा वालवस प्रा. लि. ची 12 खोकी चोरुन नेली. अशा मजकुराच्या मिनीट्रक चालक- मुजम्मील हनिफ महंमीद, रा. हैद्राबाद यांनी दि. 07 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top