अॅट्रॉसिटीचा खोटे गुन्हा मागे घ्या, तुरोरी ग्रामस्थचे निवेदन
उमरगा (महादेव पाटील)
उमरगा तालुक्यातील मौजे.मळगीवाडी व दगडधानोरा येथील ग्रामस्यांवर दाखल करण्यात आलेले ॲट्रॉसिटीची खोटे गुन्हे तात्काळ मागे घेणे बाबत निवेदन गुरुवारी (दि.५)रोजी तुरोरी ग्रामस्थांनी उमरगा पोलिस स्टेशनला दिले आहे. वास्तविक तुरोरी गावाशी वरील दोन्ही गावे निगडीत असल्याने व सदरील नागरीकांची गावात दळणवळण आहे . त्यामुळे सदरील गावातील नागरिकांची आमची ओळख आहे .
व आतापर्यंत असा कोणताही प्रकार त्यांच्याकडून घडला नसून तक्रारदाराने दुसऱ्याच्या वैयक्तीक व्देषापोटी दुसऱ्याच्या सांगण्यावरुन तक्रारदाराने ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्याची तक्रार नोंद केलेली आहे . तरी तक्रारदारास आपल्या समक्ष बोलावून घेवुन त्यांची कसून चौकशी केल्यास सत्य समोर येवून सदर गुन्हा खोटे असल्याचे आपणास निर्दशनास येईल . सदर ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्यावे. न्याय न मिळाल्यास नाइलाजास्तव तुरोरी ग्रामस्थांना उपोषणास बसावे लागेल असा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.