शासकीय तंत्र प्रशालेच्या परिसरात जिल्हा कोषागार कार्यालयाकडून वृक्षारोपण
उस्मानाबाद,दि.05(जिमाका):- स्व. वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान अंतर्गत 2021-22 मध्ये जिल्हा कोषागार कार्यालयाद्वारे रोपांची लागवड कोषागार कार्यालय परिसर आणि शासकीय तंत्र प्रशालेच्या आवारात करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यावर्षी कार्यालयास देण्यात आलेल्या 300 झाडांची लागवड पूर्ण करण्यात आली आहे.
दि. 04 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हा कोषागार कार्यालय यांच्याकडून काशीद, चिंच, सीताफळ, शिसव, अशोक, पेरु अशा प्रकारच्या 300 रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी सचिन संदिपान इगे, सहाय्यक वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) आर.आर.चौबे, तंत्रप्रशालेचे पिसे, आडसुळ तसेच कोषागार कार्यालयातील सर्व अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
*****