चला रक्ताचे नाते जोडूया 'कनगरा येथे पञकार अमोल गायकवाड यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

0


"चला रक्ताचे नाते जोडूया"  'कनगरा'  येथे पञकार अमोल गायकवाड यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा


कनगरा/प्रतिनिधी
                उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा येथे पञकार अमोल गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.शनिवार,७ आॅगस्ट २०२१ रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.कोरोनाच्या पार्श्वभूमिवर रक्ताची  गरज मोठ्या प्रमाणात भासत असल्याने सामाजिक बांधिलकी समजून रक्तदान शिबीरासारखा सामाजिक उपक्रम कनगरा येथील तरुणांनी पञकार अमोल गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत हाती घेतला होता.गावातील तरुणांसह जिल्हा परिषद शाळेचे मुख्याद्यापक,लोहार बी.के.व शाळेतील शिक्षकांनी रक्तदान शिबीरात सहभाग नोंदवला होता.कार्यक्रमाचे उद्घाटकन पञकार प्रशांत सोनटक्के यांच्या हास्ते करण्यात आले,तर  कार्यक्रमाचे अध्यक्ष लातूर शिक्षण विभागाचे मा.उपाध्यक्ष दिलीप पाटील हे होते.




           कोरोनाच्या महामारीत अनेकांना आपला जीव गमवावा लागला,तर अनेक नागरिक अशक्त झाल्याने त्यांना रक्ताची गरज भासत असल्याने तरुणांनी उदंड प्रतिसाद नोंदवला होता.शिबीरात रक्तदान करणार्‍या रक्तदात्याला आयोजकाच्या वतीने प्रमाणपञ व 2लिटरचा प्रेशर कुकर भेट व वृक्षांचे वाटप करण्यात आले..




             यावेळी शिक्षणतज्ञ घनश्याम टाकेकर,अभिमन्यु इंगळे,विजयसिंह कदम,अॅड.अजय पाटील.ग्रा.प.सदस्य गोविंद ढोबळे,मधुकर गंगणे,राघू तिघाडे,ग्रा.प.सदस्य शिराज शेख आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top