काॅंग्रेस सेवादलाच्या तालुकाध्यक्ष पदी डाॅ.सोनटक्के यांची निवड
कनगरा/प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्हा काॅग्रेस सेवादलाच्या वतीने शहिद राजगुरू यांची जयंती जिल्हा काॅग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा कार्यालयात साजरी करण्यात अाली.यावेळी मा.मंञी मधुकरराव चव्हाण यांचे समर्थक तथा टाकळी(बें) गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष डॉ.काकासाहेब धनाजी सोनटक्के यांची काँग्रेस सेवा दल यंग ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष पदी काॅंग्रेस कमिटीच्या वतीने निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीबद्दल उस्मानाबाद तालुक्यातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.डाॅ.सोनटक्के यांनी मा.मंञी मधुकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काॅंग्रेस पक्षाच्या वाढीसाठी काम केले आहे.तसेच उच्च विद्याविभूषित असलेले डाॅ.सोनटक्के सामाजिक कामातही अग्रेसर आहेत.विविध सामाजिक संघटनांच्या महत्वाच्या पदाच्या जबाबदार्याही त्यांनी पार पाडल्या आहेत.
यावेळी जिल्हा काॅग्रेस कमीटीचे जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, जिल्हा काॅग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सय्यद खलील,जिल्हा काॅग्रेस कमिटीचे अध्यक्ष विलास शाळू,मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, असंघटीत कागार सेनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद एडके,जिल्हा संघटक अायुब पठाण, काॅग्रेस सेवादल यंग ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अॅड.प्रणित डिकले,उपाध्यक्ष प्रशांत पाटील, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीचे सदस्य आनंत दादा घोंगरे, जिल्हा सरचिटणीस शामराव भोसले, तुळजापुर काॅग्रेसचे तालुकाध्यक्ष तानाजी जाधव,कळंब ता.अध्यक्ष पोपटराव अंबिरकर,काॅग्रेस सेवादल जाॅईंट काॅर्डिनेटर धीरज धालगडे, उस्मानाबाद ता.अध्यक्ष मेहराज शेख, संतोष माने,आदि कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती.