महाराष्ट्र कौशल्य स्पर्धेसाठीमहास्वयंम वर माहिती भरण्याचे आवाहन

0

महाराष्ट्र कौशल्य स्पर्धेसाठी

महास्वयंम वर माहिती भरण्याचे आवाहन

उस्मानाबाद,दि.13(जिमाका):-महाराष्ट्र कौशल्य स्पर्धा  2021 साठी जिल्हास्तर,विभागीयस्तरावर आणि राज्यस्त्‍रावर स्पर्ध आणिमहास्वयंम  पोर्टलवर 2019-20 वर्षात नोंदणी करण्यात आलेली होती.परंतु कोरोनामुळे स्पर्धा कार्यक्रम स्थगीत ठेवण्यात आला होता. शासनाने जिल्हास्तरावरील स्पर्धा दि.17 व 18 ऑगस्ट 2021 रोजी,  विभागस्तर स्पर्धा 23 व 24 ऑगस्ट 2021 रोजी, राज्यस्तरावरील स्पर्धा  03 ते 05 सप्टेंबर 2021 या कालावधीत स्पर्धा घेण्याचे निश्चिीत केले आहे.

यापूर्वी ज्या इच्छुक उमेदवारांनी कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी  नोंदणी केलेली नाही. त्यांना देखील दि.15 ऑगस्ट 2021 पर्यंत गुगल फॉर्म  लिंकद्वारे https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScc9hV8zb9eIBlPWfEYny_XK0485eibd8vzLbX24LphXPQDw/viewform  नोंदणी करता येणार आहे.सर्व नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या स्पर्धा घेाषीत कार्यक्रमानुसार होतील.या स्पर्धेकरिता वयोमर्यादा ही दि. 01 जानेवारी 1991 ला किंवा त्यानंतर जन्म झालेल्या सर्व युवा-युवतींसाठी स्पर्धा खुली आहे. 

उस्मानाबाद जिल्हयातील सर्व शासकीय आणि  खाजगी औद्योगिक  प्रशिक्षण  संस्था,  महाविद्यालय आणि संबंधित सर्व संस्थांनी,उमेदवारांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी नोंदणी करावी,असे आवाहन कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागामार्फत करण्यात येत आहे.अधिक माहितीसाठी ज्यांना या स्पर्धेत भाग घ्यावायचा आहे. त्यांनी जिल्हयातील सहायक आयुक्त कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र उस्मानाबाद अथवा प्राचार्य  गव्हरमेंट आयटीआय उस्मानाबाद यांना संपर्क साधावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top