गुप्ता यांनी दिली नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट

0

गुप्ता यांनी दिली नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट


उस्मानाबाद दि.१८ (प्रतिनिधी) - येथील वैराग रोड परिसरात असलेल्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी दि.१७ ऑगस्ट रोजी भेट देऊन त्या ठिकाणी करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती घेऊन पाहणी केली.


 यावेळी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. शकील अहमद खान यांनी येथील कामाची सविस्तर माहिती दिली. यावेळी गुप्ता यांना कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस देऊन लसीकरणाचे प्रमाणपत्र डॉ. खान यांनी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गुप्ता यांनी या आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्या दिल्या. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हाडकुळे, शेळगावकर आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top