प्रहार अपंग संघटनेच्या ९६ व्या शाखेचे उदघाटन...
उस्मानाबाद :- राज्याचे राज्यमंत्री तथा प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.ना राज्यमंत्री बच्चू (भाऊ) कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार अपंग क्रांती आंदोलन उस्मानाबाद च्या वतीने मौजे आरणी,ता.जि उस्मानाबाद येथे प्रहार अपंग क्रांती आंदोलन उस्मानाबादच्या 96 व्या शाखेचे उदघाटन करण्यात आले.
प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या हस्ते या शाखेचे उदघाटन करण्यात आले,शाखेचे उदघाटन अतिशय उत्साहात व आनंदाच्या वातावरणात संपन्न झाले आरणी शाखेच्या अध्यक्षपदी श्री हनुमंत चव्हाण,उपाध्यक्षपदी बंडू शिंदे तर सचिवपदी संजय पठाण यांची नियुक्ती करण्यात आली यांचे व गावातील समस्त अपंग बंधू भगिनींचे प्रहत संघटनेत स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
यावेळी प्रहार संघटनेचे उपाध्यक्ष नवनाथ मोहिते,उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील,बाबासाहेब भोईटे, जमीर शेख, दादासाहेब अकोसकर,नवनाथ कचार, दिनेश पोतदार,सबदार सय्यद,रामा अडसूळ,शिवाजी पोतदार, दत्ता शितोळे,इरफान वस्ताद,कैलास लाखपते व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते...