बरमगाव बु येथे ग्रामसमृद्धी सामाजिक व बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आण्णाभाऊ साठे जयंती साजरी
आज 1 ऑगष्ट रोजी साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती बरमगाव बु येथे उत्सहात साजरी करण्यात आली .प्रतिमा पूजन करून पूरग्रस्त भागात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना व शेकाप चे आमदार गणपत देशमुख यांना
श्रद्धांजली वाहण्यात आली .
या वेळी सरपंच बाळकृष्ण गोरे यांनी साहित्याच्या माध्यमातून उपेक्षितांच्या जीवन संघर्षाचे वास्तव अधोरेखित करून समाज परिवर्तनासाठी अण्णाभाऊ साठे यांनी आयुष्यभर लढा दिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्रामात अण्णाभाऊंनी शाहिरीतुन दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे. असे प्रतिपादन केले
या वेळी गावचे सरपंच बाळकृष्ण गोरे ,उपसरपंच पोपट ढवळे ,ग्रा .सदस्य दत्तात्रय कांबळे,नंदकुमार घोडके ,धनंजय कांबळे ,गावचे पोलीस पाटील बळीराम सिरसाठे ,अमरदीप कांबळे ,कैलास कांबळे ,गोविंद कांबळे ,संतोष दनाने
ग्रामसमृद्धी संस्थेचे सचिव अमर आगळे व लहुरत्न ग्रुप चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते .