लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 101 वी जयंती साजरी
युवकांनी संघटीत होऊन समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा - आमदार ज्ञानराज चौगुले
उमरगा (महादेव पाटील)
उमरगा शहारत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते झेंडावंदन व प्रतिमा पूजन करण्यात आले. उपस्थितांना आ.चौगुले आव्हान करताना म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांचे विचार आत्मसात करून युवकांनी संघटीत होऊन समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. कोरोना सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत गावागावात अण्णाभाऊ साठे यांची जयंती साधेपणाने साजरी होत आहे. तसेच ग्रामीण भागातीलही सर्वसामान्य जनता व दलित बांधव यांनी सामाजिक बांधिलकी जोपासल्याचे पाहून आमदार ज्ञानराज चौगुले यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी माजी जिप सदस्य दिलीप भालेराव, जिप सदस्य प्रकाश अष्टे, शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव शहापुरे पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे, माजी सभापती जिप हरीश डावरे, शिवाजी गायकवाड, राम गायकवाड, संजय सरवदे, दिलीप गायकवाड, शिवसेना उपतालुका प्रमुख शेखर मुदकन्ना, शिवसेना विभाग प्रमुख प्रशांत पोचापुरे आदि उपस्थित होते.