लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ३ वाचनालयाचे उद्घाटन
प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती वाचनालय उमरगा होळी, कलदेव निंबळा येथे कार्यरत
उमरगा (महादेव पाटील)
लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती वाचनालयाच्या काळा निंबाळा, होळी आणि उमरगा अशा तीन ठिकाणच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले. तिन्ही वाचनालयात लोकसाहित्यिक आण्णा भाऊ साठे यांच्या समग्र वाड्मयासह इतर दर्जेदार पुस्तकांचा समावेश आहे. वाचनालयाच्या उद्घाटनानंतर काळा निंबाळा व होळी येथे वृक्षारोपणही करण्यात आले. त्याचबरोबर ॲड. शितल चव्हाण फाऊंडेशनच्या वतीने होळी व काळा निंबाळा या ठिकाणी वाचनालय परिसरात बसून वाचन करण्यासाठी सिमेंट बाकडे भेट देण्यात आले.
प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती वाचनालय मुळज, होळी (दोन शाखा), काळा निंबाळा आणि उमरगा अशा पाच ठिकाणी कार्यान्वित असून अजून सहा शाखा काढण्याचा संकल्प आहे.वाचन संस्कृती रुजवण्याच्या माझ्या या धडपडीत सत्यनारायण जाधव, धानय्या स्वामी, सुखदेव सरवदे, सहदेव सरवदे, प्रदिप मोरे, चंद्रहर्ष जाधव, आप्पा जाधव, राजू बटगिरे, केशव सरवदे, श्रीरंग सरवदे, राजू भालेराव, किशोर औरादे, करीम शेख, अनुराधा पाटील यांचा मोलाचा सहभाग आहे.