उस्मानाबाद शहर प्रभाग क्रं.१९ मधील असंख्य युवकांचा भाजपात प्रवेश
उस्मानाबाद :-
जगातील सर्वात मोठया राष्ट्रीय पक्षात म्हणजे भारतीय जनता पार्टीत धाराशिव शहरातील प्रभाग क्रं.१९ मधील धारासुर मर्दिनी देवी मंदीर, इदगाह भागातील कार्यकर्त्यांनी सागर शहाजी दंडनाईक यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे नेते तथा तुळजापुर विधानसभा आमदार राणाजगजितसिंह पाटील व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते असंख्य युवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
या प्रसंगी नितीन काळे बोलत असतांना म्हणाले की सबका साथ सबका विश्वास सबका विकास या ध्येयवादाने पुढे चालणाऱ्या भाजपा पार्टीत आपणा सर्वांचे स्वागत. भारतीय जनता पक्ष हा कुण्या एका कुटुंबाचा पक्ष नसुन हा सर्व जातीधर्म समावेशक पक्ष असल्याचे ही नितीन काळे यांनी सांगीतले. तसेच कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणुन बोलत असतांना आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की उस्मानाबाद शहराचा विकास करणे हे माझे स्वप्न आणि ध्येय आहे.
आपण शहरात विकास व्हावा या हेतुन उस्मानाबाद शहरात रेल्वे जंक्शन व्हावे यासाठी केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा करत आहोत आणि करत राहु. हे जंक्शन झाल्यामुळे शहराच्या विकासाला आर्थिक चालना मिळणार असुन अनेक बेरोजगार युवक-युवतींना हाताला काम मिळणार आहे. रेल्वे जंक्शन प्रमाणे कौडगाव येथे माजी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मंजुर झालेल्या टेक्नीकल टेक्स्टाईल पार्क मागील २ वर्षापासुन प्रलंबित आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार यावर कोणताही निर्णय घेत नाही ते टेक्नीकल टेक्सटाईल पार्क सुरु झाले तर या भागातील १०००० हजार युवकांना रोजगार मिळणार आहे, आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वात देशातील महिला सक्षमीकरण हा भारतीय जनता पार्टीचा महत्वाचा अजेंडा आहे आणि या मध्ये स्वनिधी योजना असेल किंवा महिला बचत गट असेल, त्यामुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होणार असल्याचे आ.पाटील यांनी सांगीतले.
या प्रवेश कार्यक्रमास भाजपा जिल्हा समन्वयक नेताजी पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, उपनगराध्यक्ष अभय इंगळे, नगर सेवक बापु पवार, विलास लोंढे तसेच सागर दंडनाईक यांच्या सोबत भाजपात प्रवेश केलेले नारायण गव्हंडे, दिलीप शेरखाने, एजाज भाई शेख, सौ.सुकेशनी शिंदे, पिंटु सरडे, सागर भालेराव, संजय मुंडे, बबलु शेख, भुजंग अवधुते, रमेश लांडगे, भागवत जगताप, महेंद्र सुरवसे, अनिल माळी, दिपक कदम, शंकर भोसले, संजय लांडगे, गणेश चव्हाण, सचिन रसाळ, जब्बार शेख, अनिल गायकवाड, राहुल धावारे, सुरेश देडे, किशोर क्षीरसागर, गणेश सुरवसे, विकास विधाते, बालाजी वराडे, बाळु शिंदे, हमीद शेख, मिलींद भोसले, महेबुब शेख, दादा शेख, बापु आयवडे, प्रमोद मोरे, विजय देवकर, विनोद तेलंग, जिवन अंकुश, पप्पु चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यीनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.