विद्यार्थ्यांनी भविष्याचा वेध घेऊन शिक्षण घ्यावे-डॉ.प्रतापसिंह पाटील ; येरमाळा येथील विद्यानिकेतनमध्ये पार पडला गुणवंत सत्कार सोहळा

0
विद्यार्थ्यांनी भविष्याचा वेध घेऊन शिक्षण घ्यावे-डॉ.प्रतापसिंह पाटील

येरमाळा येथील विद्यानिकेतनमध्ये पार पडला गुणवंत सत्कार सोहळा

उस्मानाबाद-विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचं क्षेत्र निवडून त्यामध्येच शिक्षण घ्यावे तरच आपण आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो असे प्रतिपादन धनेश्‍वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी येरमाळा येथील विद्या निकेतन प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.







यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोधले महाराज हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अर्शद रजवी,मांडवाच्या सरपंच डॉ. योगिनीताई देशमुख,संजय देशमुख, विद्यानिकेतन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन पाटील यांच्यासह पालक व गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते.



 पुढे बोलताना डॉ.प्रतापसिंह पाटील म्हणाले की,दहावी हा जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे या टप्प्यावर आपल्याला पुढील शिक्षणासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते आणि आज ती गरज गूगल,यूट्यूबच्या माध्यमातून पूर्ण होत आहे.आपण भविष्यात कोणते शिक्षण घ्यावे याची माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांनी घ्यावी. आपल्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घेतले तर जीवनात नक्की तो यशस्वी होईल असे प्रतिपादन त्यांनी केले.


यावेळी मुंबई महानगरपालिकेत डेप्युटी इंजिनिअर असलेले संजय देशमुख कार्यक्रमाचे अध्यक्ष बोधले महाराज व उपस्थित पालक प्रतिनिधी म्हणून सतीश बावळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर गुणवंत विद्यार्थ्यांपैकी अभिलाषा रकटे व नम्रता देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


 विद्यानिकेतन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये या शाळेची उभारणी नेमकी कशी केली आणि शाळा उभारणी करत असताना कोणत्या अडचणी आल्या व त्यावर कशी मात केली हे विषद केले व भविष्यात देखील विद्यानिकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुषेन जाधवर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top