वडगाव(देव) येथे शेती विषयक विविध योजना आणि पीक मार्गदर्शन शिबिर संपन्न : युवकांनी शेती पूरक व्यवसाय आणि लघुउद्योगाकडे वाटचाल करावी ; राजसिंहा राजेनिंबाळकर.
किलज :- तुळजापूर तालुक्यातील वडगाव (देव) येथे भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष .राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा वडगाव(देव) ,तुळजापूर यांच्या वतीने शेतकरी बांधवांसाठी शेतीविषयक विविध योजना आणि पीक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यामध्ये शेतकरी वर्गांना शेतीतील विविध अडीअडचणी लक्षात घेत ,विविध नवनवीन योजना योग्य रीतीने समजून सांगत समूह सहाय्यक,नानाजी कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत स्नेहल पाटील यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे हे प्रमुख अतिथी होते.जिल्हाध्यक्ष नितीन काळे हे या कार्यक्रमाप्रसंगी बोलत असताना गावातील शेतकरी वर्गासोबत विविध प्रश्नांवर चर्चा केले.
गेल्या २० ते २५ दिवसांपासून पाऊस नसल्याने अनेक शेतकऱ्यांची पीके ही मरणावस्थेत असून अनेकांच्या शेतातील विद्युत पुरवठा या असुरळीत असल्याचे गावातील शेतकरी वर्गानी बोलतेवेळी सांगितले.नितीन काळे यांनी शेतकरी वर्गांना पावसाअभावी शेतीतील पिकांची होत असलेली दशा पाहून मी स्वतः या महाविकास सरकारपर्यंत या संबंधी आवाज उठवेन असे सांगितले.
तसेच राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी युवकांना व शेतकऱ्यांशी संवाद साधला.युवकांना शेती पूरक व्यवसाय आणि लघु उद्योगाकडे वळण्यासासाठी आवाहन केले.या शिबिरासाठी शेती विषयक माहीती मार्गदर्शिका म्हणून स्नेहल पाटील यांनी शेतकऱ्यांना विविध योजना, शेती विषयक माहिती मुद्देसूद दिली. या शिबिरासाठी वडगाव (देव) सह परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते. या शिबिराचे आयोजन प्रसाद राजमाने तसेच वडगाव (देव) येथील भारतीय जनता युवा मोर्चा यांनी केले होते
.या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष धाराशिव नितीन काळे, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर,नानाजी कृषी संजीवनी प्रकल्प महाराष्ट्र अंतर्गत समूह सहाय्यक बरोबरच शिबिराच्या मार्गदर्शिका स्नेहल पाटील,वडगाव देव च्या सरपंच पदमीनी सगट,उपसरपंच उत्तम देवकते, आशा कार्यकर्त्या शामल शिंदे, सुभाष राजमाने,विठ्ठल पाटील,विठ्ठल राजमाने, प्रतीक भोसले,विशाल केदार उत्तम कालेकर,पवन पाटील,उमाकांत पाटील, नितीन राजमाने, केरनाथ कांबळे,विजय गोटे व गावातील ग्रामस्थ व युवा मोर्चा सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .