उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा दौरा

0

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा दौरा

        उस्मानाबाद,दि.10(जिमाका):- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे येत्या 13 ऑगस्ट 2021 रोजी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.


मंत्री श्री.सामंत यांचे दुपारी 12:30 वाजता उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृहावर आगमन होईल. तेथे ते पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतील. दुपारी 1 ते  1:30 हा वेळ राखीव असेल. दुपारी  1:30 वाजता येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या उप-परिसर आढावा बैठकीस उपस्थित राहतील.




 दुपारी 2 : 15 वाजता विद्यापीठ उप-परिसरातच राष्ट्रीय सेवा योजना कोविड योध्यांच्या सत्कार समारंभास उपस्थित राहतील. दुपारी 2:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने देण्यात येणाऱ्या व्हेंटिलेटरच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहतील. दुपारी 3:00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांची पत्रकार परिषद होईल. दुपारी 3:30 वाजता ते उस्मानाबादहून लातूरकडे प्रयाण करतील.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top