वानेवाडीने ई-पीक पाहणी अभियानांतर्गत १०० टक्के काम पूर्ण : जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केला सत्कार
उस्मानाबाद :- तालुक्यातील वानेवाडी या गावाने इ पीक पाहणी अभियानात १०० टक्के काम पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांचा आज दिनांक १५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार करण्यात आला यावेळी तहसीलदार गणेश माळी उपस्थित होते
ई पीक पाहणी अभियानामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील वानेवाडी येथील ३३१ शेतकऱ्यांनी १०० टक्के ई - पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून पूर्ण करून १०० टक्के कामकाज केलेले वानेवाडी हे उस्मानाबाद जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे यामध्ये नायब तहसीलदार तुषार बोरकर मंडळ अधिकारी ए बी तीर्थकर मंडळ कृषी अधिकारी देशमुख कृषी सहाय्यक वैभव लेणेकर व तलाठी आर बी पाटील यांनी उत्कृष्ट काम केले आहे
तसेच कौंड येथे १ हजार ९५० शेतकरी खातेदारांपैकी १ हजार ३११ खातेदारांनी पीक पाहणी पूर्ण करून चार आकडी नोंदणी पूर्ण करण्याचे उत्कृष्ट कार्य केले यामध्ये कृषी सहाय्यक श्रीमती संगिता लाड व तलाठी बी.एस. लाकाळ यांनी उत्कृष्ट कामकाज गावातील तरुण युवक व शेतकऱ्यांच्या मदतीने केले आहे
अशी माहिती तहसीलदार गणेश माळी यांनी दिली आहे