काळेगाव येथे आमदार राणा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले रस्ता कामाचे उद्घाटन
काळेगाव ( प्रकाश साखरे )
गावातील रस्त्याची दुरावस्था झाल्या मुळे ग्रामपंचायत च्या वतीने आमदार पाटील यांना निवेदन देवून गावातील रस्त्याची दुरावस्था सांगितली. त्यानंतर आमदार पाटील यांनी CMGSY या योजनेतून रा. मा. २८८ ते काळेगाव ०.५५ कि. मी रस्त्यासाठी गावास ४३ लाख ७२ हजार निधी मिळवून दिला त्या कामाचे आज आमदार पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी पंचायत समिती सदस्य कलसुरे उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन सरपंच शुभांगी भोवाळ उपसरपंच आनंदराव उंबरे पाटील ग्रामसेवका टी. ए. शेख मॅडम यांनी केले यावेळी गावातील व बाहेर गावातील अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते