उस्मानाबाद शहरातील प्रभाग क्रं.१ मधील असंख्य युवकांचा भाजपात प्रवेश

0



उस्मानाबाद शहरातील प्रभाग क्रं.१ मधील असंख्य युवकांचा भाजपात प्रवेश 

उस्मानाबाद :- जगातील सर्वात मोठया राष्ट्रीय पक्षात म्हणजे भारतीय जनता पार्टीत प्रभाग क्र 1 मधील तेरणा कॉलेज परिसरातील सेवालाल कॉलनी धाराशिव मधील असंख्य युवकांनी भारतीय जनता पार्टीचे नेते तथातुळजापुर विधानसभा आमदार लोकनेते राणाजगजितसिंह पाटील व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते, अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

येणाऱ्या काळात पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनात युवा पिढी देशाच्या विकासासाठी भरीव योगदान देऊ शकेल तसेच एक सक्षम आत्मनिर्भर युवा होण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा कटिबद्ध आहे .

या प्रवेश प्रसंगी भाजपात प्रवेश केलेले नितीन राठोडअमोल राठोडलहू चव्हाणराहुल पवारअजित गायकवाडप्रदीप एडकेपंडित कांबळेकिरण पवार यांच्यासह अनेक युवकांनी प्रवेश केला. या प्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस ॲड. नितीन भोसले, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, शहराध्यक्ष राहुल काकडेएस.सी.मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रवीण सिरसाठेभाजयुमो तालुकाध्यक्ष ओम नाईकवाडीहिम्मत भोसलेअमोलराजे निंबाळकर, विनोद निंबाळकर,  आदी उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top