चोरीच्या वायरसह आरोपी अटकेत
उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखा : शेतातील कुपनलीकेची विद्युत वायर चोरीस गेल्यावरुन तुळजापूर पो.ठा. येथे गु.र.क्र. 310 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत तपासास आहे. तपासादरम्यान स्था.गु.शा. च्या पोनि- श्री. गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील पोउपनि- श्री माने, पोना- सय्यद, चव्हाण, पोकॉ- मारलापल्ले, आरसेवाड, कोळी यांच्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दतीचा अभ्यास केला. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने चिंचोली, ता. तुळजापूर येथील लखन राजेंद्र भोसले या 19 वर्षीय युवकास ताब्यात घेउन चोरीतील वायर जप्त केली असून त्यास तुळजापूर पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.