चारचाकी वाहनासह गोवा बनावटीची दारू जप्त
उस्मानाबादच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची कामगिरी
उस्मानाबाद :- चार चाकी वाहनासह गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग उस्मानाबाद यांच्या वतीने सांगण्यात आली आहे ही कारवाई दस्मेगाव ते वाशी रोड वर दि १४ सप्टेंबर रोजी करण्यात आली
राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई उमाप यांचे आदेशान्वये संचालक उषा वर्मा विभागीय उप आयुक्त औरंगाबाद विभाग औरंगाबाद पी एच पवार व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क उस्मानाबाद विजय चिंचाळकर यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात परराज्यातून येणारे मद्य कर चुकविलेले मद्य इत्यादी प्रकारच्या अवैद्य मद्यविक्री वर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत कार्यवाही करून गुन्हे नोंदवण्याची मोहीम चालू आहे दोन महिन्यापासून जिल्ह्यात विविध ठिकाणी सामूहिक धाडसत्र आयोजित करून अवैध मद्यनिर्मिती केंद्रावर कार्यवाही करण्यात येत आहे १४ सप्टेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दसमेगाव ते वाशी रोडवर वाहतूक करीत असताना दसमेगाव शिवार तालुका वाशी येथे जावेद युनुस इनामदार हा गोवा राज्यात निर्मित व केवळ गोवा राज्यात विक्री असलेले मद्य वाहतूक करणार असल्याचे खात्रीलायक बातमी मिळाल्या नुसार निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क आर एस कोतवाल दुय्यम निरीक्षक पी जी कदम बी एल ओव्हाळ एस पी काळे एस के शेटे जवान एम पी कंकाळ आर आर गिरी ए बी बोंगाणे वाहन चालक ए आर शेख यांच्या पथकाने चार चाकी वाहन क्रमांक एम एच १३ एझेड ८४८२ या पांढऱ्या रंगाच्या वाहनाची गुन्हा अन्वेषण कामी पाटलाग करीत असताना सदरील इसमाने वाहनाचा अचानक ब्रेक लावला व गाडीचा वेग संथ होताच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन तो पळाला नंतर सदरचे वाहनाची तपासणी केली असता गोवा राज्यात निर्मित व केवळ गोवा राज्यात विक्रीस असलेल्या मॅकडॉल नंबर वन व्हिस्की १८० मिलीचे २६० बॉटल एक टाटा कंपनीची इंडिका विस्टा पांढऱ्या रंगाची चार चाकी वाहन जप्त करण्यात आले आहे सदरील वाहनासह मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ९१ हजार सहाशे रुपये असून सदरील गुन्ह्यातील फरार आरोपी जावेद युनुस इनामदार याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५(अ)(इ) १०८ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे सदरील प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक उत्पादन शुल्क विभाग भूम बी एल ओव्हाळ हे करीत आहेत