17 वर्षापासुन पाहिजे असलेला आरोपी अटकेत.”
परंडा पोलीस ठाणे : वडगांव (नळी), ता. भुम येथील भावड्या उध्दव काळे याचा भुम पो.ठा. गु.र.क्र. 37 / 2004 मध्ये सहभाग असल्याने पोलीस त्याचा शोध घेत असल्याने गेली 17 वर्षे तो पोलीसांना हुलकावनी देत होता. गोपनीय माहिती आधारे परंडा पो. ठा. च्या पोनि- श्री. सुनिल गीड्डे यांच्या मार्गदर्शनाखालील पोहेकॉ- कळसाईन, पोना- घोळवे, पोकॉ- कोळेकर, सय्यद यांच्या पथकाने त्यास आज दि. 03 सप्टेंबर रोजी भुम तालुक्यातून ताब्यात घेतले आहे.
“मोटार वाहन कायदा अंतर्गत कारवाई.”
उस्मानाबाद पोलीस दलातर्फे दि. 02 सप्टेंबर रोजी महत्वाच्या रस्त्यांवर मोटार वाहन कायदा- नियम व कोविड- 19 संबंधी मनाई आदेशांची अंमलबजावनी करुन नियम भंग करणाऱ्यांवर एकुण 278 कारवाया करुन 58,600 ₹ ‘तडजोड शुल्क’ वसुल केले आहे.
“जुगार विरोधी कारवाई.”
उस्मानाबाद जिल्हा : 1) शिवाजी पडळकर, रा. तेर, 2) वैजिनाथ शिंदे, रा. सौंदना (आं) 3) नितीन यादव , रा. शिराढोन हे दि. 02 सप्टेंबर रोजी तेर येथे कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य, 2,500 ₹ रोख रक्कम बाळगलेले असतांना ढोकी पो.ठा. च्या पथकास आढळले. तसेच याकुब जेवळे, रा. आलुर हे याच दिवशी आलुर शिवारात सुरट जुगार चालवण्याचे साहित्य व 440 ₹ रोख रक्कम बाळगलेले असतांना मुरुम पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.
“सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकपने वाहन उभा करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
परंडा पोलीस ठाणे : नागनाथ बिभीषण थोरबोले, रा. परंडा यांनी दि. 02 सप्टेंबर रोजी 17.00 वा. सु. त्यांचे बोलेरो वाहन क्र. एम.एच. 25 आर 5575 हे परंडा न्यायालयाच्या प्रवेशद्वारसमोर रहदारीस धोकादायकरित्या उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन परंडा पो.ठा. चे आण्णासाहेब लोमटे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन गुन्हा नोंदवला आहे.
“आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल.”
तामलवाडी पोलीस ठाणे : श्रीमती- रिजवाना रियाज अत्तार, वय 32 वर्षे, रा. काटी, ता. तुळजापूर यांनी दि. 01.09.2021 रोजी राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली. पती- रियाज शब्बीर अत्तार यांनी पहिल्या पत्नीशी तलाक झाला असल्याचे रिजवाना यांना खोटी हकीकत सांगून रिजवाना यांच्याशी 2019 साली विवाह केला होता. विवाहानंतर रिजवाना यांचे सासरकडील- रियाज अत्तार (पती), शाहिदा अत्तार (सासु), सुलताना अत्तार, तनुजा अत्तार (रियाज यांची पहिली पत्नी) यांनी रिजवाना यांचा वेळोवेळी शारिरीक- मानसिक छळ करुन त्यांना माहेराहुन 2,00,000 ₹ आनण्याचा तगादा लावला. या छळास कंटाळून रिजवाना यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या रफीक नबीलाल डोंगरी, रा. सोलापूर यांनी दि. 02 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306, 498 (अ) 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“फसवणूक.”
लोहारा पोलीस ठाणे : तावशीगड येथील शिवाजी गीरी यांच्या भ्रमणध्वनीवर दि. 01 सप्टेंबर रोजी कर्ज मंजुरी योजने संबंधी एक लघू संदेश आला. यावर त्या संदेशातील लिंकवर गीरी यांनी आपली व्यक्तीगत बँक माहीती भरली असता त्यांना एका अज्ञाताचा फोन आला. समोरील व्यक्तीने, “तुमचे कर्ज मंजुर झाले असून त्या पोटी 38,775 ₹ शुल्क सांगीतलेल्या बँक खात्यात भरावी लागेल.” असे सांगीतले. यावर गीरी यांनी काही एक विचार न करता मित्राच्या युपीआय खात्यातून त्या समोरील व्यक्तीच्या खात्यात ती रक्कम भरली. कालांतराने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावरुन भा.दं.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“चोरी.”
भुम पोलीस ठाणे : अरुण मुरलीधर गवळी, रा. शेंडगे गल्ली, भुम यांच्या राहत्या घराचा कडी- कोयंडा अज्ञाताने दि. 02 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारा तोडून घरातील 9.5 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने, पितळेची भांडी व 20,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. यावरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद (श.) पोलीस ठाणे : बाळु सोपान हिप्परकर, रा. टोनवाडी, ता. बार्शी यांनी त्यांची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 13 बीटी 7592 ही दि. 31.08.2021 रोजी 10.30 ते 11.00 वा. दरम्यान शासकीय जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद च्या आवारात लावली असता ती अज्ञाताने चोरुन नेली आहे. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“अपघात.”
उमरगा पोलीस ठाणे : नारायण मनोहर राठोड, वय 35 वर्षे, रा. कृष्णानगर तांडा, जकेकुरवाडी, ता. उमरगा हे दि. 31.08.2021 रोजी 16.30 वा. सु. जकेकुरवाडी फाटा येथील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 12 ईए 6580 ही चालवत जात होते. दरम्यान अज्ञात चालकाने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एयु 4017 निष्काळजीपने चालवून नारायण राठोड यांच्या मो.सा. ला पाठीमागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर नमूद मो.सा. चा अज्ञात चालक अपघातस्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा भाऊ- प्रेमनाथ राठोड यांनी दि. 02 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“मारहान.”
परंडा पोलीस ठाणे : लहु अंकुश काशीद, रा. दुधी, ता. पंरडा हे सहपत्नीक दि. 30.08.2021 रोजी 17.00 वा. सु. शेतातील घरात होते. यावेळी ग्रामस्थ- लक्ष्मण जगदाळे, महादेव जगदाळे, मारुती जगदाळे, सौदागर जगदाळे, नामदेव जगदाळे, बाळासाहेब कवटे, बाबासाहेब कवटे यांसह अन्य एक अनोळखी पुरुष अशा आठ जणांनी संगणमत करुन पुर्वीच्या वादावरुन काशीद यांच्या घरात घुसून लहु यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी देउन कोयता, लोखंडी गज, चैन, काठी, दगडाने मारहान केली. यात लहु यांच्या डाव्या पायाचे हाड मोडून ते गंभीर जखमी झाले. यावेळी लहु यांची पत्नी त्यांच्या बचावास सरसावली असता त्यांनाही मारहान केली. अशा मजकुराच्या लहु काशीद यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 326, 384, 323, 143, 147, 148, 149, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी पोलीस ठाणे : कोंड येथील नरसिंग चव्हाण हे पत्नी महानंदासह दि. 01 सप्टेंबर रोजी 16.30 वा. कोंड शिवारातील शेतात होते. दरम्यान पती- पत्नीत झालेल्या वादातून नरसिंग यांनी महानंदा यांच्या मस्तकावर पाठ, पोट व हातावर विळ्याने वार करुन गंभीर जखमी करुन कापडाने महानंदा यांचा गळा आवळून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. या मारहानीत महानंदा यांच्या डाव्या हाताचे हाड मोडले. अशा मजकुराच्या मुलगा- सचिन चव्हाण याने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 326 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.