समाजाच्या शेवटच्या घटकासाठी काम करत राहा - रामदास कोळगे

0

समाजाच्या शेवटच्या घटकासाठी काम करत राहा  - रामदास कोळगे


      रुईभर दि 25 (प्रतिनिधी)समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्या समाजाला न्याय मिळेपर्यंत प्रयत्न करत राहा असे विचार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडले होते पंडित दीनदयाळ उपाध्याय हे  जनसंघाचे नेते होते त्यांनी भारत देशामध्ये आदर्श राजकारणी निर्माण झाले पाहिजेत म्हणून एकात्म मानवतावादाचा  विचार संग्रहातून विविध विषय मांडून त्यांनी देशभरातील नागरिकांना आदर्श विचार दिले की त्या विचारला बाजूला ठेवून आपण काम करू शकत नाही आपल्या देशाचे पंतप्रधान  नरेंद्र  मोदी हे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार आदर्श मानून शेवटच्या घटकासाठी काम करताना दिसून येत आहेत त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत असे मत भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा पूर्व संपर्कप्रमुख रामदास कोळगे यांनी रूईभर येथील ग्रामपंचायत ने आयोजित केलेल्या पंडितजींच्या जयंतीनिमित्त विचार व्यक्त केले यावेळी ज्येष्ठ नागरिक गोपाळ निंबाळकर यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सरपंच बालाजी कोळगे ,राजेंद्र भंनगे, धनंजय चव्हाण ,बाबासाहेब कोळगे, राजेंद्र गव्हाणे, शंकर  चव्हाण ,सुरेश कलाल, सहदेव कोळगे ,कुंदन बनसोडे, नवनाथ जाधव ,तुकाराम निंबाळकर, सुरवसे ,बाबा चव्हाण इ. नागरिक हजर होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top