महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगनरावजी भुजबळ याची निर्दोष मुक्तता उस्मानाबादेत जल्लोष
उस्मानाबाद :- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद , शाखा उस्मानाबाद च्या वतीने आज मा ना छगनरावजी भुजबळ , अन्न नागरी पुरवठा कॅबिनेट मंत्री यांची दिल्ली येथील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता करून तसेच नवी मुंबईतील खारघर हाऊसिंग घोटाळ्या प्रकरणात मा खासदार समीर भुजबळ व मा आमदार पंकज भुजबळ यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
सत्य परेशान हो सकता है , पराजित नही
या बद्दल आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ,जिल्हा उस्मानाबाद च्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले चौक , उस्मानाबाद येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला या वेळी पेढे वाटून गुलाल उधळून फटाके फोडून आजचा विजयी दिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, उस्मानाबाद चे जिल्हाध्यक्ष महादेव माळी , तालुकाध्यक्ष रॉबिन बगाडे , सौ ज्योती सतिश माळाळे तालुकाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस उस्मानाबाद ,किरण एडके , सागर शेंडगे ,अक्षय थोरात तसेच बहुजन बांधव उपस्थित होते .....