उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांची बदली

0

उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांची बदली

उस्मानाबाद - (  उस्मानाबाद न्युज )
 उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांची बदली झाली आहे व त्यांना उपायुक्त मुंबई शहर  नवीन पदभार देण्यात येणार आहे. उस्मानाबाद येथे राज तिलक रौशन यांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी मोठे प्रयत्न केले व त्यात त्यांना यश देखील आले आहे त्यामुळेच त्यांची बदली राज्याचे प्रमुख शहर येथे उपायुक्त म्हणून करण्यात आली असावी.

राज तिलक रौशन यांनी ऑगस्ट २०१९ मध्ये उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षक पदाचा पदभार घेतला होता. गेल्या दोन वर्षात त्यांनी बऱ्यापैकी कामगिरी वाजवली. तसेच  कोरोना काळात त्यांनी चांगले काम केले. 


उस्मानाबाद तालुक्यात २०१५ मध्ये  वाघोली येथे एक अनोळखी माहिलेचे शव आढळले . यात ओळख पटवणे अतिशय अवघड असताना राजतिलक रौशन यांनी तिच्या अंगातील कुर्ताच्या लेबल टॅगवरूनऑनलाईन फ्लिपकार्ट कंपनीकडून, असे कुर्ता खरेदी करणाऱ्या ग्राहकांची यादी व मोबाईल नंबर घेऊन त्या सर्व मोबाईलचे लोकेशन तपासले असता, एका मोबाईलचे वाघोली लोकेशन आढळले. एवढ्या  तुटपुंज्या माहितीवरूनच मयत व आरोपीची ओळख पटवून तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असता तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास कामाबद्दल पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी एसपी राजतिलक रौशन यांना सर्वोत्कृष्ट ‘अपराधसिध्दी’ प्रशस्तीपत्र  देऊन सन्मानित केले होते. 


 उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षक म्हणून निवा जैन या पदभार घेणार आहेत अशी माहिती मिळाली आहे. निवा जैन यांची समादेशक राज्य राखीव पोलीस बल, गट 1 पुणे येथून उस्मानाबाद पोलीस अधीक्षक पदी बदली झाली आहे. जैन यांच्या रूपाने उस्मानाबाद जिल्ह्याला प्रथम महिला पोलीस अधीक्षक पदाचा मान मिळाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top