शेतकरी सामान्य कुटुंबांतील शेतमजुर यांच्यासारख्या गरीब मुलांना घडविण्याच काम शिक्षकांच्या हातुन होतं - खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर
उस्मानाबाद-उस्मानाबाद जिल्हा तेली समाज सेवाभावी संघटनेच्या वतीने गुणवंत शिक्षण सन्मान सोहळ्याची सुरूवात तेली समाजाचे आराध्य दैवत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार कैलास घाडगे पाटील,नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर यांच्या हस्ते करून कार्यक्रमाचे प्रस्ताविक तेली समाजाचे आजवरचे कार्य व यापुढेही होणारे विविध कामासंदर्भात रवि कोरे यांनी माहिती दिली.याप्रसंगी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी शिक्षक हा राष्ट्राचा मुलभुत पाया आहे.शिक्षक हा राष्ट्रनिमिर्तीत मुलभुत घटक आहे.यांचा गुणगौरव झालाच पाहिजे.त्यांच्या पाठिवर हि कौतुकाची थाप टाकली तर अजुन जोमाने कष्ट करून चांगले विद्यार्थी घडतील.असे मकरंद राजेनिंबाळकर या़नी आपल्या भाषणात सांगितले.खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आपल्या भाषणात सांगितले कि,शेतकरी शेतमजुर सामान्य लोकांची मुलं घडविण्याच काम जि प शाळेतुन हे शिक्षक वृंद घडवितात म्हणुन यांचे कार्याचं कौतुक करावे तेवढे कमीच आहे.याप्रसंगी खासदार साहेबांनी त्यांच्या शाळेतल्या सर्व जुन्या आठवणींना या गुणवंत शिक्षकां समोर उजाळा दिला.या शिक्षकांच्या सन्माचा सोहळा तेली समाज संघटनेने ठेवल्याबद्दल तेसेच शिक्षकांचे कौतुक करून सन्मान सोहळा ठेवल्याबद्दल अभिनंदन व्यक्त केले.आई व वडिलांबरोबर मुलांना घडविण्याचे कुणाचे काम असेल तर ते फक्त शिक्षकचं करू शकतात.जि प शाळेतील शिक्षक हे मिरीटवर व गुणवत्ता पारकुणच निवडले जातात त्यामुळे जि प शाळेतील मुलं चांगली घडतात असे शिक्षक चुकला तर अखी पिढी बरबाद होते म्हणुन शिक्षकांचे महत्व किती आहे हे सांगण्याची गरज नाही.सर्व शिक्षक वृदांचे हार शाल व सन्मान पत्र देऊन 2021 व 2022 या दोन वर्षातील तेली समाजातील गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त उस्मानाबाद जिल्हयातील उस्मानाबाद,तुळजापुर,लोहारा,उमरगा,कळंब,वाशी,भुम,परंडा तालुक्यातील 46 शिक्षकवृंद यांचा सन्मान सोहळा पार पडला.कार्यक्रमाचे सुत्रसंचल सचिन राऊत यांनी केले.या कार्यक्रमास जि प सदस्य नितिन शेरखाने,समता परीषदेचे राज्य सरचिटणीस आबासाहेब खोत,तेली समाजाचे जिल्हाउपाध्यक्ष राजाभाऊ घोडके,सचिव अँड विशाल साखरे,कोषाध्यक्ष महादेव मेंगले,प्राचार्य अनिल देशमाने,दत्ता बेगमपुरे,शिवलिंग होनखांबे,चंद्रकांत मेंगले,कलशेट्टी अशोक चिंचकर,भिमाशंकर डोकडे,नागेश निर्मळे,सर्यकांत चौधरी,दिपक नाईक,संजोग पवार,दिपक पवार,जितेंद्र घोडके,कपिल नवगिरे आदिंची उपस्थिती होती.