उस्मानाबाद शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीची सत्ता स्थापन करू - जिल्हाध्यक्ष प्रा सुरेश बिराजदार

0

उस्मानाबाद शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीची सत्ता स्थापन करू - जिल्हाध्यक्ष प्रा सुरेश बिराजदार

उस्मानाबाद : प्रतिनिधी :   उस्मानाबाद शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व मागास जिल्ह्याचा शिक्का पुसून काढण्यासाठी  नगरपालिका निवडनूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करत सत्ता स्थापन करावी . असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या उस्मानाबाद शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत व्यक्त केले .


                उस्मानाबाद शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुका संदर्भात शासकीय विश्रामगृहात जिल्हाध्यक्ष प्रा  बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली दि .११ रोजी आढावा बैठक संपन्न झाली .


                  या बैठकीला माजी आमदार राहुल मोटे ,जिल्हा कार्याध्यक्ष संजय दुधगावकर पाटील, प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील ज्येष्ठ नेते संपत डोके, संजय निंबाळकर, जिल्हा उपाध्यक्ष कादर खान, वाजिद पठाण, जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, प्रतापसिंह पाटील, युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती .
                          पुढे बोलताना  मा . शरदचंद्र पवार साहेबांच्या आग्रही भुमिकेने उस्मानाबाद येथे वैद्यकीय महाविद्यालय मंजुर झाले . तसेच आपल्या शहरासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या भुयारी गटारीसाठी नीधी उपलब्ध करूण देण्याचा उस्मानाबादकरांना दिलेला शब्द उपमुख्यमंत्री अजितदादांनी पुर्ण केला आहे .ही निश्चितच आपल्या कार्यकर्त्यासाठी अभिमानाची बाब आहे.असे मत यावेळी बोलताना बिराजदार यांनी व्यक्त केले.
                       

         पक्षाच्या बुथ कमिटीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार व पक्षाच्या माध्यमातून करण्यात येणारी कामे आणि भूमिका तळागाळापर्यंत पर्यंत पोहोचवावेत असे मत माजी आ. राहुल मोटे यांनी व्यक्त केले . या वेळी शहरातील ज्येष्ठ, युवक, विद्यार्थी व विविध सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



                                       यावेळी शहरअध्यक्ष आयाज शेख, शहर कार्याध्यक्ष सचिन तावडे, शहर उपाध्यक्ष मनोज मुदगल, अनिकेत पाटील, अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष खलील पठाण, सांस्कृतिक विभाग जिल्हा अध्यक्ष विशाल शिंगाडे,न प गटनेते गणेश खोचरे, नगरसेवक प्रदीप मुंडे, खलिफा कुरेशी, बाबा मुजावर, इस्माईल शेख, महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा मगर, महिला जिल्हा कार्याध्यक्ष मनीषा पाटील, मिनील काकडे, रणधीर इंगळे, इलियास पिरजादे, मृत्युंजय बनसोडे,अन्वर शेख, बिलाल तांबोळी, वैभव मोरे, अमोल सुरवसे, इस्माईल काजी, सोशल मीडिया लतीफ पटेल, संग्राम बनसोडे, रतन बनसोडे, अतुल आदमाने, शेखर घोडके,शहर प्रवक्ता अभिजीत व्हटकर, विद्यार्थी शहराध्यक्ष सौरभ देशमुख, विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष चैतन्य माने यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top