काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश !
उस्मानाबाद :- तालुक्यातील ढोकी येथील नासेरभाई शेख व श्री.दत्तात्रय(बबन) देशमुख यांनी भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सर्वाचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
भारतीय जनता पार्टी हा जनसेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या अनुषंगाने नासेरभाईंची भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या जिल्हा संघटक पदी नियुक्ती केली. येणाऱ्या काळात दोघेही पूर्ण ताकदीनिशी जनतेची सेवा करतील असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील व्यक्त केला
यावेळी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निहाल काझी, श्री.झुंबर बोडके, परवेज काझी, श्री.विलास रसाळ, श्री.काका पाटील, श्री.मंगेश तिवारी, श्री. किशोर तिवारी, श्री.एजाज काझी, श्री.राजू रसाळ, श्री.अंकुश जाधव, श्री.दत्ता धावारे व कार्यकर्ते उपस्थित होते.