google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 मयत व्यक्तींची माहिती देण्याचे उस्मानाबाद पोलिस ठाण्याचे आवाहन

मयत व्यक्तींची माहिती देण्याचे उस्मानाबाद पोलिस ठाण्याचे आवाहन

0


मयत व्यक्तींची माहिती देण्याचे उस्मानाबाद पोलिस ठाण्याचे आवाहन

 

उस्मानाबाद,दि.08(जिमाका):- बसस्थानक येथील लोहारा प्लॅट फॉर्ममध्ये दि.05 सप्टेंबर-2021 रोजी एक अनोळखी स्त्री ही मयत अवस्थेत मिळून आली आहे. या मयत व्यक्तीची ओळख पटलेली नाही.

मयत स्त्री व्यक्तीचे अंदाजे वय-90 वर्ष,रंगनिमगोरा,केस-पुर्ण पांढरे,डाव्या हाताच्या  मुठीवर ओम चिन्ह गोंदलेले,कपाळावर,उजव्या हाताचे मनगटावर फुल चिन्ह गोंदलेले,उंची-155 से.मी.,अंगात नेसणीस असलेली लाल रंगाची छापील साडी,गुलाबी रंगाची स्वेटर,पोपटी रंगाचे गोल गळयाचे ब्लाउज आणि लाल रंगाच्या दोन्ही हातामध्ये 10 बांगडया,नाक-सरळ,चेह-यावर सुरकत्या पडलेल्या,गाल आत गेलेले,गळयामध्ये काळया मण्यात ओवलेले पाच पिवळया धातुचे मणी,नाकावर वरील बाजुस मस आहे. मयत व्यक्तीचा उपलब्ध असलेला फोटो सोबत जोडलेला आहे. तरी मयत व्यक्तीबद्दल कोणास माहिती असल्यास श्री.दराडे मो.नं.8390090099 किंवा श्री.शिंदे मो.नं.9881745820 या क्रमांकावर तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन पोलीस स्टेशन आनंदनगर,उस्मानाबाद यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top