उस्मानाबाद शहरातील अहेमद कुरेशी सह आनेक तरुणांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
उस्मानाबाद :- शहरातील अहेमद कुरेशी मित्र मंडळ व स्वप्नील शिंगाडे मित्र मंडळ यांच्यासह शेकडो तरुणांनी प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी जनता बँकेचे संचालक विश्वासराव शिंदे, प्रदेश सचिव दिलीप भालेराव, जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, संघटक राजाभाऊ शेरखाने, कार्याध्यक्ष सय्यद खलील सर, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, डॉ.स्मिता शहापुरकर, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, कळंब तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, जावेद काझी, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, माजी नगरसेवक दर्शन कोळगे, उमेश राजेनिंबाळकर, विजय मुद्दे, धनंजय राऊत, अलीम शेख, प्रभाकर लोंढे, देवानंद येडके, सुरेंद्र पाटील, अभिषेक बागल, मिलिंद गोवर्धन, विश्वजित शिंदे, संजय गजधने, राहुल लोखंडे, अजहर पठाण, ज्योतीताई सपाटे, अतिफ काझी, अभिजित देडे, सलमान शेख, सुधीर अलकुंटे, मेहराज शेख, सौरव गायकवाड, सचिन धाकतोडे, अंकुश पेठे, कफिल सय्यद यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
आगामी नगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्ष ताकदीने लढणार असून जास्तीतजास्त तरुणांना संधी दिली जाणार असल्याचे बसवराज पाटील म्हणाले.
प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे प्रदेश काँग्रेसच्या वतीने बसवराज पाटील यांनी स्वागत केले.
सूत्रसंचालन शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे यांनी केले तर आभार नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे यांनी मानले.
यावेळी उपस्थित होते.