E peek pahani app -
ई पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील 1 लाख 16 हजार 957 शेतकऱ्यांच्या पिकपेराच्यी नोंंद :- जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर
उस्मानाबाद :- जिल्ह्यात आज ११६९५७ खातेदारांची E पीक पाहणी अॅप मार्फत पिकपेऱ्याची नोंद पूर्ण झाली. महसूल व कृषी विभागाकडील नोंदीनुसार जिल्ह्यात एकूण ४०९९९५ खातेदार शेतकरी आहेत. म्हणजेच आज २५% शेतकऱ्यांची पेऱ्याची माहिती नोंद झाली. नजर पीक पाहणी, नजर पैसेवारी या पाहणी पद्धतीवर कायमच प्रश्नचिन्ह नोंदवले जाते. अतिवृष्टी, पीकविमा, पीक कापणी प्रयोगाचे वेळी एकूण पेरणी क्षेत्र, पीक लागवड याचे अंदाज चुकू शकतात. त्याचा परिणाम शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यात होतो. पिकविम्याबाबत अनेक तक्रारी प्रशासनाकडे येतात. कंपनी शेतापर्यंत पोचत नाही ही तक्रार दिसून येते. तलाठी, कृषी सहाय्यक व संबंधित यंत्रणा पंचनामे करतात. प्रत्येक शेतात जाऊन अंदाज घेणे सर्वस्वी अशक्य होते. मात्र जेव्हा e पीक पाहणी मार्फत इतकी विस्तृत माहिती मिळते तेव्हा या अडचणी दूर होतात. ५% क्षेत्राची पाहणी करून संपूर्ण महसूल मंडळातील नुकसानाचा अंदाज घ्यावा लागतो त्यावेळी साहजिकच त्यात तफावत उद्भवते. ही अडचण दूर होण्यास खूप मोठी मदत e पिक पाहणी मुळे होत आहे. पीक पेरा ऑनलाईन न घेतल्याने कोरा राहणार नाही. तलाठी नेहमीच्या पद्धतीने पीक पाहणी करणार आहेत. मात्र वर म्हटल्याप्रमाणे जास्तीत जास्त खातेदारांची नोंद ऑनलाईन होणे अचूकतेसाठी फायद्याचेच आहे. पण अँप बद्दल काही अडचणी नक्की येतात. त्यावर मात करत ही वाटचाल सुरू आहे. महसूल विभाग आणि कृषी विभाग यांची यंत्रणा, शेतकरी या सर्वांनी यात पुढाकार घेतला. तांत्रिक कारणे पुढे करून नुकसानीचा अंदाज न येऊ देणे या प्रवृत्तीवर ही पारदर्शकताच उपाय आहे. याचा काय उपयोग? तंत्रज्ञान शेवटपर्यंत पोचत नाही. असे मतप्रवाह येतच राहणार आहेत. मात्र Data war च्या जमान्यात शेतकऱ्यांची बाजू घेणारा data जमा करणे आणि त्याची मांडणी करणे हे महत्वाचे आहे.
अशी पोस्ट उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावाकर यांनी फेसबुक पेज च्या माध्यमातून केली आहे