माळुंब्रा येथे 140 नागरिकांचे लसीकरण
प्रतिनिधी (सांगवी काटी)
सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपकेंद्र अंतर्गत माळुंब्रा येथे 140 नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. माळुंब्रा उपकेंद्र अंतर्गत सांगवी (काटी) माळुंब्रा, पांगरधरवाडी,व कदमवाडी या चार गावातील लोकांनी या लसीकरणाचा लाभ घेतला. हे शिबिर पार पाडण्यासाठी आरोग्य विभागामार्फत समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर स्वाती बारस्कर, आरोग्यसेविका भारत बाई माळी, आरोग्य सेवक शिवाजी देवकर, आशा सुपरवायझर लक्ष्मी बाळासाहेब मगर, आशा स्वयंसेविका अर्चना मगर, अनिता भोसले, छाया सुतार, पद्मिनी भिशे, अलका सुतार, वासंती ताकमोगे,ग्रामसेविका पाटील जे डी मॅडम,डुरे पाटील आरोग्य सेविका. व गावातली नागरिकांचे सहकार्य लाभले.